महाराष्ट्र
मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोंडस नातवाने जिंकले पीएम मोदींचे मन !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यासंदर्भात स्वतः शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नातवाने मोदी यांचेही मन जिंकून घेतले.
या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिंदे यांनी मोदी यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. शिंदे ट्विट करत म्हणाले की,जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर मुलांमध्ये मिसळावे, त्यांच्या भावनांशी एकरूप व्हावे, असे मोदी म्हणतात. जेव्हा जेव्हा बालकांच्या सहवासाची संधी मिळते तेव्हा ते स्वतःलाही विसरतात. आजही असंच झालं!



