क्राईम

स्कुटीवर बसलेले असताना अचानक मागून आले, काही कळायच्या आत सपासप वार

  • अज्ञात मारेकऱ्यांनी स्कुटीवर थांबलेल्या एका तरुणावर चाकूने वार करुन त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी पाठलाग करत तरुणाच्या मानेवर, पोटात आणि पाठीवर तब्बल ८ ते १० खंजर खुपसले.
  • रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अमोल भुजबळ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
  • अधिक माहितीनुसार, अमोल भुजबळ हा नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथील रहिवासी असून तो एका खाजगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास तो स्कुटीवरून गणेशनगर भागातील एका दुकानावर सामान घेण्यासाठी आला होता. तो स्कुटीवर बसलेला होता आणि दुकानदार त्याला सामान देत होता. तो स्कुटीवरुन बसलेला असताना अचानक पाठीमागून काळ्या कपड्याने तोंड झाकलेले दोघेजण धावत आले अन् त्यांनी अमोल बेसावध असताना त्याच्या मानेवर आणि पाठीवर खंजरने वार करण्यास सुरुवात केली.
  • त्यानंतर अमोल तेथून पळून जाऊ लागला मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत जवळपास ८ ते १० वार त्याच्या शरीरावर केले. या भयंकर हल्ल्यानंतर अमोल रक्ताच्या थोराळ्यात रस्त्यावर पडला. हल्लेखोर असलेल्या दोघांपैकी एकाने डोक्यावर हेल्मेट, तर दुसऱ्या एकाने काळा रुमाल तोंडाला बांधला होता. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. मात्र घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान फरार हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles

Back to top button