छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून राज्यात आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले, असे ते म्हणाले. त्यामुळे राजकीय वातावरण अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.
आव्हाड म्हणाले, औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची म्हणजे काय करायचे? महाराष्ट्राचीच ही माती आहे. सौंदर्यीकरण हा वेगळा मुद्दा आहे. एकदाची ती कबर उखडा, दररोज तेच तेच बोलले जात आहे. हजारो विषय प्रलंबित असताना केवळ औरंगजेबावरच बोलले जात आहे. इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही. औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले.