ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठा बदल

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही. पण त्यामध्ये काही सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना अधिक लाभ मिळेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही सकारात्मक परिणाम दिसून येईल.
अजितदादा यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहणार नाही, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी यात आणखी सुधारणा करण्यात येतील. सध्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात. आता या योजनेसह महिलांसाठी विशेष कर्ज योजना आणण्याची योजना आहे.
मुंबई बँकेत लाडकी बहीण योजनेच्या खातेदार महिलांना 10,000 ते 25,000 पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा सहकारी बँका आणि इतर सहकारी बँकांनाही अशा स्वरूपाच्या कर्ज योजना सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे ज्या महिलांना छोटा-मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना मोठी संधी उपलब्ध होईल.
लाडकी बहीण योजनेद्वारे दरवर्षी सुमारे 45,000 कोटी महिलांच्या हाती जात आहेत. त्यामुळे हा पैसा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देईल. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ही योजना आणखी प्रभावी केली जाईल.