क्राईम
मुलीला विकाससोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिले अन् वडील संतापले

- बीडच्या आष्टी तालुक्यात एका मालकाने ड्रायव्हरची निर्घृण हत्या केली. आरोपीने ड्रायव्हरला दोन दिवस पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवत अमानुष मारहाण केली. ही मारहाण इतकी भयावह होती की, यात ड्रायव्हरचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे.
- विकास बनसोडे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. जवळपास चार वर्षे तो क्षीरसागर यांच्याकडे काम करत होता. पण अलीकडेच त्याचे क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध सुरू झाले होते. याचा संशय क्षीरसागर यांना आल्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी विकासला कामावरून काढून टाकले. तरी त्याचे मालकाच्या पोरीसोबत प्रेमसंबंध कायम होते.
- दरम्यान, मागील आठवड्यात विकास हा कड परिसरात कामानिमित्त आला होता. कडला आल्यानंतर तो क्षीरसागरच्या मुलीला भेटायला तिच्या घराच्या परिसरात आला. दोघेजण क्षीरसागर यांच्या घरामागे असलेल्या शेतात एकमेकांना भेटले. पण शेतात दोघेही आक्षेपार्ह, नको त्या अवस्थेत दिसल्यानंतर मुलीच्या वडिलाची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने आपल्या काही नातेवाईकांच्या मदतीने विकासला पकडले.
- त्याला दोन दिवस एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवत अमानुष मारहाण केली. आरोपींनी दोरी आणि वायरच्या साहाय्याने विकास याला बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती की विकासचा तडफडून मृत्यू झाला.
- हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.