महाराष्ट्र
ब्रेकिंग! अजितदादांचे धक्कातंत्र

- विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खोडके हे अजितदादा यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती देखील समोर आली. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशान सिद्दीकी किंवा उमेश पाटील यापैकी एकाला संधी मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात सुरु होती.
- विधानपरिषदेच्या पाचही उमेदवारांची घोषणा महायुतीकडून झाली आहे. भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोडके यांना संधी देण्यात आली आहे. माहितीनुसार, सिद्दीकी यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजितदादा यांचे निकटवर्तीय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
- दरम्यान विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान होणार असून उमेदवारांना 10 मार्च ते 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे.