क्राईम
ब्रेकिंग! स्वारगेट अत्याचार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय

- पुणे अत्याचार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्वारगेट येथे बसमध्ये झालेल्या या प्रकरणात आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या गावी गुणाटला आणले आहे.
- गाडे हा फरारी असताना गुणाट गावातील शेत शिवारात कुठे कुठे लपला होता? आता त्या त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन जाणार आहेत. गाडे याने आपला मोबाईल गुणाट गावाच्या शेत शिवारात पुरून ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे. तर दुसरीकडे मात्र आपला मोबाईल हरवल्याचा दावा गाडेकडून करण्यात आला आहे.
- गेल्या आठवड्यामध्ये पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानकात ही धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. दरम्यान तरुणीच्या वैद्यकीय अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली, या तरुणीवर दोनदा अत्याचार झाल्याचे समोर आले.