महाराष्ट्र

खुशखबर! एक एप्रिलपासून वीजदर कमी होणार

  • राज्यात घरगुती, औद्योगित व वाणिज्यिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या एक एप्रिलपासून विजदर कमी होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी व बेस्टसह अन्य वीज वितरण कंपन्यांना नवीन वीज दर लागू करण्यास शुक्रवारी मध्यरात्री मंजूरी दिली.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. आता एक एप्रिलपासून ग्राहकांना वीज कमी दरात मिळणार आहे. वीज दर कमी होण्याची दोन-तीन कारणं आहेत. एक म्हणजे अपारंपरिक ऊर्जा आणि सौर ऊर्जा ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे वीजदर कमी झाले आहेत. सध्या सौरऊर्जेचे दर प्रति युनिट तीन साडेतीन रुपये आहेत. तर अपारंपरिक ऊर्जाचा दर प्रति युनिट ८ ते ९ रुपये आहे. दुसरीकडे महावितरणचे दर हे सध्या प्रति युनिट ४ ते ४.५० रुपये आहे. पण हेच दर १ एप्रिलपासून आणखी कमी होणार आहेत.
  • महावितरणचे घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट दर
  • ० ते १००- सध्याचे ४.७१ नवीन दर ४.४३
  • १०१ ते ३००- सध्याचे १०.२९ नवीन दर ९.६४
  • ३०१ ते ५००- सध्याचे १४.५५ नवीन दर १२.८३
  • ५०० पेक्षा जास्त- सध्याचे १६.७४ नवीन दर १४.३३

Related Articles

Back to top button