राजकीय

पुन्हा राजकीय भूकंप?

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. त्यात अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत मनसेनेही आपले उमेदवार उभे केले होते.
  • त्यांच्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढत होत रंगत आली. मात्र या निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही. या निच्चांकी कामगिरीचा परिणाम त्यांना आता भोगावा लागेल, अशी शक्यता आहे. मनसेची पक्ष मान्यता व चिन्ह जाण्याचा धोका यामुळे वाढला आहे. 
  • निवडणूक आयोगाचे पक्ष मान्यतेसाठी काही नियम असतात. ते सर्वांसाठी सारखेच असतात. या नियमांची माहिती विधानसभेचे माजी सचिव अनंत कळसे यांनी दिली. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, एखाद्या पक्षाची मान्यता कशीकायम राहते याचे तीन पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे आमदार निवडून आला किंवा एकूण मतदानांच्या 8 टक्के मते मिळाली तर ती राहते. दुसरा नियम म्हणजे आमदार किंवा एकूण मतदानाच्या 6 टक्के मते असली तरी ती राहते. तिसरा पर्याय म्हणजे आमदार निवडून आला किंवा एकूण मतदानाच्या 3 टक्के मते मिळाली तरी ती कायम राहू शकते.
  • पक्षाची मान्यता कायम ठेवण्यासाठी वरील तीनपैकी एक अट पूर्ण करावी लागते. मात्र या निवडणुकीत मनसेला केवळ 1.8 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. असे झाले तर त्यांच्या पक्षाचे रेल्वे इंजिन हे चिन्हही जाण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना कळसे म्हणाले की, निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. ते निर्णय घेवू शकतात. निवडणूक आयोगाकडून संबंधित पक्षांना नोटीस पाठवली जाते. निवडणूक आयोग त्यांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकते. सध्याच्या घडीला मनसेकडे दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही, असही कळसे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button