महाराष्ट्र

ब्रेकिंग! ‘मातोश्री’वर हायव्होल्टेज बैठक

राज्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण ढवळून निघत आहे. राजकीय गणिते पाहून पक्षांतरं सुरू झाली आहे. या फोडाफोडीचा पहिला फटका ठाकरे गटाला बसला आहे. पुण्यातील माजी नगरेसवक विशाल धनकवडे, बाळा ओसवाल आणि पल्लवी जावळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यानंतर आता ठाकरे गटानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत धनकवडे, ओसवाल आणि जावळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

दरम्यान, ठाकरे गटाच्या या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.धनवडे यांच्यानंतर ओसवाल यांनी देखील ठाकरे गटाला रामराम केला होता. शिवसेनेतील कार्यपद्धतीवर नाराज होत ओसवाल यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. प्रिय, शिवसैनिकांनो तुम्हाला वाईट वाटेल पण माझा निर्णय पक्का आहे, असे म्हणत ओसवाल यांनी पक्ष सोडला. आतापर्यंत पाच जणांनी भाजपमध्ये जाण्याचा विचार पक्का केला आहे.

दरम्यान ठाकरे गटाच्या पुण्यातील तिघा नगरसेवकांनी भाजपत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरे यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन पुणे शहर पदाधिकाऱ्यांची काल ‘मातोश्री’वर दोन तास बैठक घेऊन आढावा घेतला. पक्षातून जे गेले किंवा जात आहे, त्यांना जाऊ द्या, असे आदेश ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

Related Articles

Back to top button