क्राईम

छेड काढली, धक्काबुक्की केली, व्हिडीओही काढला

  • पुण्यातील स्वारगेट येथील तरुणीच्या अत्याचाराचा मुद्दा चर्चेत असतानाच जळगावातील भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलीची छेड काही टवाळखोर पोरांनी काढली. संबंधित मुलांना अडविण्याचा प्रयत्न मुलीच्या सुरक्षारक्षकांनी केला असता संबंधित टवाळखोरांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. व्हिडीओही काढला.
  • जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. टवाळखोर मुलांविरोधात सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
  • एका केंद्रीयमंत्र्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव पाहायला मिळत आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्यासारख्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसेल तर बाकीच्यांचे काय, असा सवाल केंद्रीयमंत्री खडसे यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button