महाराष्ट्र

ब्रेकिंग! करुणा मुंडेंच्या पोस्टमुळे खळबळ

  • मस्साजोग गावाचे संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाचा मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, वाल्मीक कराड हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खंडणीच्या वादातूनच देशमुख यांची हत्या झाल्याचा उल्लेख या आरोपपत्रात आहे. या प्रकरणात खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा समावेश करण्यात आला आहे. अशातच करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट माध्यमातून सूचक वक्तव्य केले आहे. उद्या तीन मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेचा राजीनामा होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
  • धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी गेल्या काही दिवसात सातत्याने होत आहेत. विरोधकांसह महायुतीतील काही आमदार देखील मुंडे यांचा राजीनामा घेण्यावर ठाम आहेत. देशमुख यांच्या हत्येनंतर मुंडे यांच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत, त्यांच्यावर आरोप होत आहेत. त्यानंतर पोलिसांच्या आरोपपत्रानंतर आता मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार का? असा सवाल उपस्थित होत असतानाच करुणा यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट माध्यमातून सूचक वक्तव्य केले आहे.
  • उद्या म्हणजेच तीन मार्च रोजी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार अशी फेसबुक पोस्ट मुंडे यांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काल पोलिसांच्या आरोप पत्रात कराड हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली.
  • त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्यावरील राजीनामाची मागणी आणि दबाव वाढत आहे. अशातच करुणा मुंडे यांची पोस्ट चर्चेत आली आहे. तीन मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही पोस्ट केली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Related Articles

Back to top button