सोलापूर
सोलापूर! शेळगीतील तरुणी धुळखेडला निघाली, पण…

सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूर ते धुळखेड एसटी बसने प्रवास करत असताना बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादी कीर्ती प्रवीण बिराजदार (वय-२४,रा. बनशंकरी नगर, शेळगी) यांच्या जवळील एक लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ६ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर एसटी स्टँड येथे घडली.
याप्रकरणी कीर्ती बिराजदार यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून,त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पाडवी हे करीत आहेत.