क्राईम
ब्रेकिंग! संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिक कराडच मुख्य आरोपी

- मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड हा वाल्मीक कराडच आहे, हे आता सिद्ध झाले आहे. सीआयडीने सादर केलेल्या आरोपपत्रातून ही माहिती समोर आली असून या आरोपपत्रात नंबर एकचा आरोपी म्हणून कराडचा उल्लेख करण्यात आला आहे.
- देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून सुद्धा कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे कराड भोवती आता कारवाईचा फास पूर्णतः आवळला गेला आहे.
- आरोपी कराड यानेच संतोष देशमुखांच्या हत्येचे प्लॅनिंग केले. यानंतर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांनी देशमुखांचा निर्घृण खून केला. या प्रकरणात मुख्य सूत्रधार कराड हाच होता, असे आरोप पत्रात म्हटले आहे.