क्राईम

नवा ट्विस्ट..! मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे संबंध सहमतीने

  • पुण्यात स्वारगेट बसस्थानकावर तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी आज मध्यरात्री अटक केली. त्याला दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्या अगोदर मात्र गाडे याने पोलिसांसमोर एक धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. गाडेच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
  • अटक केल्यानंतर गाडे याला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. तिथं आरोपीची कसून चौकशी केली जात आहे तर पोलीस कोठडीतच गाडे याने टाहो फोडल्याची माहिती मिळते. माझं चुकलंय. मी पापी आहे, असे म्हणत गाडे रडत असल्याचे समोर आले आहे . मी तरूणीवर अत्याचार केलेला नाही. आमचे संबंध सहमतीने झाले, असा दावा देखील गाडे याने पोलिसांसमोर केला, असे सांगण्यात येत आहे. यामुळे आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट येण्याची दाट शक्यता आहे. पीडीत तरूणी आणि आरोपी हे पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते का? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. 

Related Articles

Back to top button