महाराष्ट्र
महिला नाचवल्या, नोटा उधळल्या, सांस्कृतिक कला केंद्र की डान्स बार?

- राज्यात डान्स बारवर बंदी असताना देखील सर्रासपणे खुलेआम अनेक संस्कृतिक कला केंद्रामध्ये डान्स बार आणि डीजे सुरु असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी आज केला आहे. पुणेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. यावेळी पुणेकर यांनी सांस्कृतिक कला केंद्रामध्ये सुरू असलेल्या धिंगाण्याचे धक्कादायक व्हिडीओच दाखवले.
- राज्यातील ८२ पैकी ४२ कला केंद्रांमध्ये डान्स बार, डीजे सुरु असल्याचा दावा पुणेकर यांनी थेट केला. पत्रकार परिषदेत पुणेकर यांनी थेट धक्कादायक व्हिडीओ दाखवले. या डान्स बारवर तत्काळ बंदी आली पाहिजे. यामुळे अनेक संगीतकार, कलाकार, वाजंत्री हे देशोधडीला लागले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
- पुणेकर यांनी दाखवलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तीन ते चार महिला साडी नेसून डान्स करत आहेत. डीजेच्या तालावर या महिला डान्स करत असून काही तरुण त्यांच्यावर पैसे उधळत आहे. यावेळी तरुण अश्लिल चाळे करताना दिसत आहेत. दरम्यान सुरेखा पुणेकर यांनी शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.