क्राईम
सोलापूर! लग्नाच्या वरातीत भाडोत्री बायका नाचवल्या

- सोलापूर (प्रतिनिधी) विनापरवाना निघालेल्या वरातीत दोन बेस, दोन टॉप, त्यास एक मिक्सर व एक अॅम्पिपायर ची साऊंड सिस्टम लावून सार्वजनिक रस्त्यावर उपद्रव निर्माण केल्या प्रकरणी सदर बझार पोलिसांनी साऊंड सिस्टम मालकासह पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. हा प्रकार कुंकुबाई हॉस्पीटलमागे असलेल्या शितलादेवी मंदीर समोर असलेल्या सार्वजनिक रोडवर मंगळवारी रात्री साडे दहा वा. च्या सुमारास घडलाय. एकूण हा प्रकार ‘विना परवाना वरात ; थेट पोलीस ठाण्याच्या दारात’ असाच घडलाय.
- याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उत्तर सदर बझार भागातील रहिवासी शुभम गणेश फटफटवाले (वय-23) याच्या लग्न वरातीमध्ये, त्याच्या सांगण्यावरून मंगळवारी रात्री शितला देवी मंदिरासमोर असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर रवि रामसिंग मैनावाले (रा.घर नं 554, उत्तर सदर बझार सतनाम चौक,सोलापूर) यांनी ट्रॅक्टर मालक काकासाहेब अंबादास जाधव (रा. घर नं.13/14 विद्यानगर, पाथरुट चौक सोलापूर) याच्या ट्रॅक्टर-ट्रालीवर साऊन्ड सिस्टीम मालक युसुफ पिरजादे (रा.दमाणी नगर, सोलापूर) याच्या मालकीचे साऊंड सिस्टीम साहित्य लावून त्या साऊन्ड सिस्टीम धारक म्हणून विशाल अर्जुन पाटील (रा.घर नं.102 संजय नगर, कुमठा नाका,सोलापूर) यास बसवून सार्वजनिक रोडवर इतरांना त्रास अशा पद्धतीने साऊंड सिस्टम लावला होता. त्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती.
- त्या वरातीसमोर महिला नर्तिका असभ्य हावभाव करीत अश्लिल नृत्य करीत असताना त्याच्यासमोर लोक बेधुंद होऊन नाचत असताना मिळून आल्याप्रकरणी पोलीस हवालदार वाघमारे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.त्यानुसार भारतीय न्यास संहिता कलम 2023 चे कलम 223,270,296 (क), (ख), 3(5) प्रमाणे पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस हवालदार भोई या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.