क्राईम
बिग ब्रेकिंग! स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई

पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. यानंतर आता स्वारगेट एसटी डेपोमधल्या 23 सुरक्षारक्षकांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे.
उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक तात्काळ कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. याशिवाय स्वारगेट एसटी डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे. परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे.
पुण्यात शिवशाहीमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला.