ब्रेकिंग! साड्या, चादरी, दारुच्या बाटल्या, बसमध्येच लॉजिंग

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने पुणे हादरले आहे.
स्वारगेट बसस्थानकाचा काळा चेहरा समोर आला असून बंद चाललेल्या बसमध्ये कंडोम, साड्या, अंतर्वस्त्र, चादरी आढळून आल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी याचा पर्दाफाश केला आहे. तसेच पुण्याच्या चार जुन्या बसमध्ये लॉजिंग सुरू असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे.
स्वारगेटच्या बसस्थानकात खराब असलेल्या बसमध्ये साड्या, कंडोम, दारुच्या बाटल्या, खराब चादरी आढळल्याचे समोर आले आहे. स्वागरगेट स्थानकात पोलिसांच्या आणि सुरक्षारक्षकांच्या संमतीने हे सुरू आहे का, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. 20 सुरक्षारक्षक तैनात असताना या सुरक्षारक्षकांच्या कार्यालयासमोरच हा प्रकार घडला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले असून सुरक्षारक्षकाचे कार्यालय फोडण्यात आले.



