क्राईम
ब्रेकिंग! स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार

- पुण्यातील स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बसस्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बसस्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बसस्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. मात्र, तरीही बलात्कारासारखा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिम्मत झाली. या प्रकाराने ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज दुपारच्या सुमारास बसस्थानकातील कार्यालय फोडले.
- मोरे यांनी आज दुपारच्या वेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह एसटी स्थानक गाठले. यावेळी स्वारगेट स्थानकात ठाकरेंच्या सेनेकडून तोडफोड करण्यात आली. मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून झाल्यावर थेट आगार प्रमुखांचे कार्यालय गाठले. त्यांनी आगार प्रमुखांकडून घटनेची माहिती घेतली तसेच तुम्हाला हा प्रकार कधी माहिती पडला, असे विचारले. आगार प्रमुखांकडून व्यवस्थित उत्तरे न मिळाल्याने त्यांनी तेथील कार्यालयाच्या काचा फोडल्या.
- आम्ही घटनास्थळाची पाहणी केली. तेथील बसच्या आजूबाजूला शेकडो कन्डोम पडलेले आहेत. याचा अर्थ आजच असला प्रकार घडला असे नाही. असले प्रकार इथे रोज होतायेत. येथील सुरक्षारक्षक काय करतात? केवळ खुर्चा उबवायला येतात की काय? मला तर वाटते त्यांचाही या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर संशय मोरे यांनी व्यक्त केला.



