क्राईम

पुणे हादरले! बाईकवरून जाताना दोघांवर गोळीबार

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील देहुरोडच्या गांधीनगर परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. देहूरोड येथे वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना सराईत गुन्हेगाराकडून हा गोळीबार करण्यात आला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा एकजण गंभीर जखमी झाला आहे. काल रात्री साडे अकराच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

विक्रम रेड्डी असे गोळीबारात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर नंदकिशोर यादव जखमी झाले आहेत. काल रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी विक्रम हे आपल्या मित्रासोबत बाईकवरून जात असताना सराईत गुन्हेगार शाबीर आणि फैजलने त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. तर नंदकिशोर यांना दगडाने मारहाण केली. यात नंदकिशोर हे गंभीर जखमी झाले. तर गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या विक्रम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी नंदकिशोर यांच्या पुतणीचा काल वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त यादव यांनी रस्त्याच्या बाजुला मंडप टाकून वाढदिवस साजरा केला. आसपासच्या लोकांना जेवण देखील देण्यात आले. त्यावेळी सराईत गुन्हेगार फैजल आणि शाबीर शेख बाईकने त्याठिकाणी आले. रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यावरून त्यांनी यादव यांच्याशी वाद घातला.

त्यांनी नंदकिशोर यांना खुर्चीने मारहाण केली. हा वाद सरू असताना नंदकुमार यांचा मित्र विक्रम वाद सोडवायला आला. हाच राग मनात धरून आरोपींनी विक्रम यांच्यावर अंदाधुंद फायरिंग केली. गोळीबारात विक्रम हे गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Back to top button