सोलापूर
सोलापूर! शेळगीतील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

सोलापुरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. शेळगीतील विद्या नगर भाग दोन येथील शुभम सिद्धेश्वर राऊत (वय 23) या तरुणाने आज पहाटे आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या करून घेतली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.



