सोलापूर

ब्रेकिंग! सोलापुरात मनाई आदेश लागू

  • सोलापूर शहरात (पोलीस आयुक्तालय हद्दी मध्ये) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दि 13 फेब्रुवारी 00.01 वाजले पासुन ते 27 फेब्रुवारी 2025 रात्री 24.00 वाजे पर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) व 37 (3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. पोलीस उपायुक्त, (शहर) डॉ.दिपाली काळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
  • सोलापूर शहर धार्मिक सण, उत्सव ,जयंती, पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे. शहरात छोट्या मोठ्या कारणावरुन संप आंदोलने, निदर्शने होत असतात. आगामी काळात शब-ए-बरात, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महरशिवरात्री सण, उत्सव संपन्न होणार आहेत.तसेच इयत्ता 12 वी आणि 10 वी शालांत व माध्यमिक बोर्ड परीक्षा यासह मराठा, ओबीसी व धनगर आरक्षण वर्गैरेच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता आहे.
  • या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, भाले, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल, तसेच 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.
  • हा आदेश सक्षम पोलीस प्राधिकरणाची पुर्वपरवानगी घेतलेल्या मिरवणूका ,मोर्चे, रॅली,आंदोलने निवेदने , धरणे सभा यांना वगळून तसेच अंत्ययात्रा व अत्यावश्यक सेवा यांना लागू होणार नाहीत.

Related Articles

Back to top button