ब्रेकिंग! दहावी, बारावी परिक्षा

सोलापूर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयता 12 वी) दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयता 10 वी) दिनांक 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच परीक्षा परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 लागू करण्यात येत असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सदर परिक्षा कालावधीत सर्व परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात पालक व इतर नातेवाईक उपस्थित राहून परीक्षेमध्ये गैरवर्तन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी परिक्षा कालावधीत सकाळी 9.00 ते 18.00 वा.या वेळेत परिक्षा केंद्राच्या भोवती (सुट्टीचे दिवस वगळून) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 चा आदेश लागू केले असून, परिक्षेच्या कालावधीत परिक्षा केंद्राभोवती 100 मीटर परिसरात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) पालक व उपस्थितीवर बंदी घालण्यात आली आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.