महाराष्ट्र

ब्रेकिंग! ऋषीराज सावंत बेपत्ता प्रकरणात ट्विस्ट! तानाजी सावंत यांचा खुलासा; तो चार्टर प्लेनने…

  • माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीने एकच खळबळ उडाली. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. 
  • दरम्यान माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले, त्यांनी तपास सुरू केला. मात्र आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आले आहे.
  • साधारणपणे चारच्या सुमारास तानाजी सावंत यांच्या मोबाईलवर ऋषीराज यांनी एक मेसेज पाठवला तो मेसेज पाहून तानाजी सावंत घाबरले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय उड्डाणमंत्री यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आता अशी माहिती समोर येत आहे की, तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज हे विशाखापट्टणमला आहेत, ते आता पुण्याकडे निघाले आहेत. तानाजी सावंत हे स्वत: पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले असून, ते सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.

Related Articles

Back to top button