क्राईम

सोलापूरहून तुळजापूरला दर्शनासाठी जाणा-या भाविकांचा भीषण अपघात

  • सोलापूरहून तुळजापूरला दर्शनासाठी जाणा-या भाविकांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 15 भाविक जखमी असल्याची माहिती आहे. मोहाळ तालुक्यातील सोलापूर-पुणे महामार्गावर कोळेवाडी येथे हा अपघात घडला आहे. जखमी रुग्णावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
  • मिळालेल्या माहितीनुसार कोळेवाडी येथील रस्त्यावर एका कंटेनरने मिनी बसला आज पहाटेच्या सुमारास जोराची धडक दिली. त्यात मिनी बस जागेवर पलटी झाली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, मिनी बसचचा चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • सोलापूर पुणे महामार्गावर ट्रक आणि बाईकचा आधी अपघात झाला. त्यानंतर ट्रकने रॉंग साईडने जाऊन मिनी बसला जोराची धडक दिली. ट्रकची मिनी बसला जोराची धडक बसल्यामुळे मिनी बस जागेवर पलटी झाली. या अपघातात तुळजापूर देवदर्शनाला जाणाऱ्या भाविक ठार झाले आहेत तर पंधरा जण जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातात बाईकस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार आणि आणखी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button