क्राईम
अश्लील व्हिडिओ दाखवत शिक्षकाचा चौथीतील मुलीवर अत्याचार

- खासगी शिकवणी घेणाऱ्या 45 वर्षीय शिक्षकाने चौथीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील नर्सरी कॉलनीत ही घटना घडली आहे. सुभाष जाधव असे खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
- घटनेची माहिती मिळताच संतप्त जमावाने शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. वाळुज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरु आहे. अश्या घाणेरड्या कृत्यामुळेच दीड वर्षांपूर्वी जाधव या शिक्षकाला शाळेतून काढले होते, अशीही माहिती समोर आली आहे.
- सामाजिक कार्यकर्ता दीपक बडे यांनी याबाबत सांगितले की, एक जोडपे मागील 18 वर्षांपासून रांजणगाव शेणपुंजी येथे वास्तव्यास आहे. त्यांची अकरा वर्षांची मुलगी एका खासगी शिकवणीत शिक्षण घेते. त्या शिकवणी चालकाने या मुलीवर अत्याचार केला.
- यामुळे घाबरलेली मुलगी शिकवणीला जाण्यास नकार देत होती. मात्र, शिकवणीला जात नाही म्हणून तिच्या पालकांनी तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला.



