- ‘स्मार्टफोन मोबाइल’मुळे अनेकांना वेड लागलयं. मग, लहान मुले कसे असतील मागे. लहान मुलांना तर, जेवताना हमखास लागतो. मोबाइल दिले नाही म्हणून, जेवणच करत नाही. काही मुले तर, मोबाइलच्या नादात स्वतःचा जीव दिले आहे. लहान वयात मुलांच्या लक्षात येत नाही, जास्त वेळ मोबाइल पाहिल्याने डोळ्यांना इजा पोहचतो, हे कळत नाही. म्हणून, नि:शुल्क विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सोलापूरातील कै.आशय्या ईरय्या आरकाल – आंध्र भद्रावती मराठी विद्यालय (श्री मार्कंडेय रुग्णालय मागे) येथे केले आहे.
- श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम व पद्मकमळ प्रतिष्ठान’च्यावतीनेम महर्षी मार्कंडेय महामुनी, बुध्दीदेवता श्री गणेश जन्मोत्सव व जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित आहे.
ब्रेकिंग! स्मार्टफोनमुळे तुमच्या मुलांना चष्मा लागला आहे का?
