महाराष्ट्र

राहुल सोलापूरकर ही औरंगाजेबाची औलाद, दिसेल तिथे ठेचून काढा

आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असे विधान अभिनेता राहुल सोलापूरकर याने केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. सोलापूरकरच्या विधानानंतर राज्यातील शिवप्रेमींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वच संतापले आहेत. त्यामुळे शिवरायांबाबत असे विधान करणाऱ्या सोलापूरकरला दिसेल तिथे ठेचून काढावे, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. सोलापूरकरसारख्यांच्या जिभा हासडल्या पाहिजेत, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. उदयनराजेंनी आज बुधवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलापूरकरविरोधात संताप व्यक्त केला. राहुल सोलापूरकर ही औरंगाजेबाची औलाद, गोळ्या घातल्या पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.

Related Articles

Back to top button