महाराष्ट्र

नाक घासून माफी मागा नाहीतर घरात घुसून…

  • अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर शिवप्रेमींनी थेट सोलापूरकर यांच्या घराबाहेर आंदोलन केले. सोलापूरकरांनी जाहीर माफीही मागितली. मात्र यानंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राग शांत झालेला नाही. दरम्यान आज सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.
  • कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक येथे आज धिक्कार व जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी थेट सोलापूरकर यांच्या घराबाहेर धाव घेतली. तसेच त्या ठिकाणी ठिय्या मारत सोलापूरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोलापूरकर यांनी नाक घासून छत्रपती शिवरायांची माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांकडून लावून धरण्यात आली.
  • सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, त्यानंतरच सोलापूरकर यांच्या घराबाहेरचे आंदोलन थांबवण्यात येईल, असे देखील आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे बराच काळ सोलापूरकर यांच्या घराबाहेर गोंधळ सुरूच होता. याबाबत बोलताना शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, अशी वक्तव्य करणाऱ्यांना देशातून तडीपार करण्याची आवश्यकता आहे. सोलापूरकर यांच्या घरावर चाल करून जाणार आणि त्याला तुडवणार आहे.

Related Articles

Back to top button