खेळ
ब्रेकिंग! भारत-पाक सामना रद्द होणार?

- आशिया कप स्पर्धेला सुरूवात झाली असून आज दुबईतील स्टेडियममध्ये भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे. मात्र, हा सामना सुरू होण्याच्या काही तास अगोदरच मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. फक्त हेच नाही तर आज या निर्णयाविरोधात जोरदार निर्देशने होताना दिसत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले. हेच नाही तर स्थिती युद्धापर्यंत जाऊन पोहोचली होती. पहलगाम हल्ल्यात अनेक निर्दोष लोकांचा जीव गेल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले. भारतीय क्रिकेटर्सचा देखील या सामन्याला विरोध असल्याचा दावा केला जात आहे.
- या सामन्याच्या काही तास अगोदरच एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. एका इंग्रजी दैनिकात भारत आणि पाकिस्तान सामन्याचा धक्कादायक रिपोर्ट देण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, भारताच्या ड्रेसिंगरूममध्ये या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे वारे वाहत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळाडू आणि इतर स्टॉपसोबत चर्चा केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकात आले आहे.
- यासोबतच भारतीय संघातील खेळाडूंना व्यावसायिक राहण्यास सांगण्यात आले आहे. इतर सामन्याप्रमाणेच हा सामना खेळण्यास सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. भारत- पाकिस्तान सामना खेळवला जाईल असे वाटले नव्हते, असे रायन टेन यांनी म्हटले आहे. भारत- पाकिस्तान सामन्याच्या अगोदर भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या रायन टेन यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच टीम इंडियाच्या ड्रेसिंगरूममध्ये थेट बहिष्काराचे वातावरण असताना गंभीर यांनी सर्व खेळाडूंशी चर्चा केली. आता खेळाडू सामन्यावर बहिष्कार टाकणार की, मैदानात पाकिस्तानला धूळ चारणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दरवेळीच्या तुलनेत भारत- पाकिस्तान सामन्याची तिकिटेही म्हणावी तशी विकली गेली नसल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. भारतीय प्रेक्षकही मोठ्या संख्येने या सामन्याला विरोध करताना दिसत आहेत.



