राजकीय
महाविकास आघाडीत काँग्रेसच मोठा भाऊ!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत चार उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत काँग्रेसने सर्वाधिक 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीत 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. यानंतर काँग्रेसने तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांची नावे जाहीर केली आणि त्यानंतर चौथ्या यादीत 14 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. म्हणजे काँग्रेसने आतापर्यंत 99 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष बनला आहे असे मानले जात आहे.