क्राईम

ब्रेकिंग! स्वारगेट अत्याचार प्रकरणात पुन्हा ट्विस्ट

  • स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेची बाजू आता प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. असीम सरोदे न्यायालयात मांडणार आहेत. तसेच पीडित तरुणीची सुरू असलेली बदनामी थांबवण्यासाठी ते अर्ज दाखल करणार आहेत. 
  • सध्या पीडित तरुणी मानसिक तणावाखाली असून तिला आत्महत्येचे विचार येत असल्याचे असीम सरोदे यांनी सांगितले.
  • या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी पीडितेने संमतीने शरीरसंबंध ठेवले असल्याचा दावा केल्याने पीडित तरुणीवर मानसिक तणाव वाढला आहे. तिच्या समुपदेशनासाठी दोन समुपदेशकांची मदत घेण्यात येत आहे. बलात्कारानंतर समाज माध्यमांद्वारे पीडितेची बदनामी केली जात असल्याने ती खूप व्यथित झाली आहे, असे ॲड. सरोदे यांनी सांगितले.
  • ॲड. असीम सरोदे म्हणाले की, पीडितेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम्ही कोर्टात वकीलपत्र दाखल केले आहे. तिच्या मानसिक स्थितीचा विचार करून न्यायालयाने तिचे संरक्षण सुनिश्चित करावे. तसेच पीडितेबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये होणाऱ्या असंवेदनशील चर्चेवर नाराजी व्यक्त करत त्यांनी पोलिसांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

Related Articles

Back to top button