ब्रेकिंग! राज्यात जीबीएसमुळे आणखी एकाचा बळी

पुणे जिल्ह्यात जीबीएसने थैमान घातले आहे. जीबीएसमुळे पुण्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये देखील जीबीएसने एका ३६ वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवाशी असून तो २१ जानेवारीला पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला होता. दवाखान्यात दाखल झाल्यापासून तो व्हेंटिलेटरवर होता. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकष्टा केली. मात्र, काल त्याचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पुण्यात सध्या जीबीएस बाधितांची संख्या १३० वर पोहोचली आहे. यातील ७३ जणांना रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २० रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून १५०० पेक्षा जास्त घराचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यात गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या ही शंभरच्या वर गेली आहे. राज्यात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत.