क्राईम

ब्रेकिंग! संतोष देशमुख हत्या प्रकरणात ट्विस्ट

  • मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटून केला आहे. या हत्या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. तीन महिन्यांपासून बीड पोलिसांसह सीआयडीला गुंगारा देणारा कृष्णा नेमका कुठे आहे? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच आता कृष्णाच्या लोकेशनबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
  • देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा हा नाशिकमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णाला आज सकाळी बघितल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. याबाबतची माहिती मिळताच नाशिक पोलीस हे परिसरात दाखल झाले आहेत.
  • नागरिकांच्या म्हण्याणुसार, एका बाईकवर कृष्ण आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. दत्त मंदिराकडे जात असताना एका बाजूला दोघे उभे होते. त्यापैकी एकाने मास्क खाली घेताच तो कृष्णा असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मी तात्काळ पोलिसांना फोन केल्याचे त्याने म्हटले आहे. याची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
  • त्यांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून तपास सुरू केला आहे. कृष्णासोबत असणारा साथीदार कोण, याचीही चर्चा सुरू झाली आहे. कृष्णाला हटकल्यानंतर त्याने बाईकवरून पोबारा केला. त्यावेळी कृष्णासोबत असलेला साथीदार हा स्थानिक असल्याची शक्यता आहे. देशमुख हत्या प्रकरणात नाशिक कनेक्शन समोर आले होते. त्यामुळे वाल्मिक कराडशी संबंधित कोणीतरी कृष्णाला मदत करत असल्याचा संशय आहे.
  • स्थानिकांनी कृष्णाची ओळख पटवल्यानंतर ज्याप्रमाणे बाईक पळवली, त्यानुसार हा त्याला स्थानिक रस्त्यांची अधिक माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृष्णासोबत आता त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Back to top button