बिजनेस
ब्रेकिंग! एक फेब्रुवारीपासून सोनं महागणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या बजेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बजेटमध्ये काय स्वस्त होणार? काय महाग होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. बजेटमध्ये सोन्याच्या किमतीवरील कराबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये सरकार सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवू शकते.
अर्थमंत्री सीतारामण शनिवारी बजेट सादर करणार आहेत. या बजेटमध्ये सरकार सोन्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. सरकार सोन्यावरील आयात शुल्क म्हणे कस्टम ड्युटी वाढवण्याच्या तयारीत आहे. जर बजेटमध्ये सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा झाली तर सोन्याची आयात महाग होईल. त्यामुळे सोन्याचा भाव आणखी वाढू शकतो.



