महाराष्ट्र
धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे नवनवे प्रताप आणि प्रकरणे समोर येत असून आता वाल्मिकचे प्रकरण अखेर मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. उच्च न्यायालयामध्ये कराडविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी थेट नाव आल्याने मंत्री धनंजय मुंडेंच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मुंडेंविरोधात आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत ईडी प्रतिवादी असून मुंडे यांच्या अनेक शेल कंपन्या असून, खंडणीची रक्कम या कंपन्यांमध्ये वळती केल्याचा गंभीर आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची ईडीकडून समांतर तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या याचिकेवर कोर्ट काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.