सोलापूर ब्रेकिंग! जीबीएस आजाराबाबत लोकांमध्ये गैरसमज

Admin
1 Min Read

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, जीबीएस आजाराबाबत लोकांमध्ये काही गैरसमज आहेत. हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका. जीबीएसमध्ये दूषित पेशी ह्या नर्व्हस सिस्टीमवर अटॅक करतात.

जुलाब आणि उलट्या झाल्याने पायातील शक्ती गेली तर ही त्याची लक्षणे आहेत. सर्दी, पडसे झाल्यानंतर हात पायातील शक्ती जाऊन गिळायला त्रास होणे आणि दम लागणे, हातापायाला मुंग्या येणे या तक्रारी जाणवू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून औषध घेऊ नका, असेही त्यांनी सांगितले.

येत्या 30 तारखेपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात हाऊस टू हाऊस सर्वे करायला सुरुवात करणार आहोत. या आजाराच्या रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. 

Share This Article