क्राईम

वैष्णवीचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचा खळबळजनक क्राइम रेकॉर्ड उघड

पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या हगवणे कुटुंबाच्या बाजूने वकील विपुल दुशींग कोर्टात बाजू मांडत आहे. काल शिवाजीनगर कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी दुशींग यांनी युक्तीवादाच्या दरम्यान वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते.

ती व्यक्ती नाही बोलली, म्हणूनच वैष्णवीने आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला. पण या दुशींग यांच्याबाबतच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2022 मध्ये एका प्रकरणाच्या सुनावणीनंतर दुशींग यांनी सरकारी वकिलाला मारहाण केली होती. या प्रकरणी दुशींग यांच्यासोबतच त्यांच्यासोबतच्या अन्य दोन वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण न्यायालयाने त्यावेळी अटकपूर्व जामीन दिल्याने दुशींग यांची अटक त्यावेळी टळली होती.

पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात दुशींग हे मार्च 2022 मध्ये एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते. दुशींग जे प्रकरण पाहात होते, त्याची सुनावणी पार पडत असतानाच न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची? यावरुन त्यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत वाद झाला‌. त्यामुळे संतापून न्यायालयातून बाहेर पडल्यावर दुशींग यांनी अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली.

यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन वकिलांनीही अग्रवाल यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. ज्यानंतर अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर दुशींग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन वकीलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण न्यायालयाने त्यावेळी अटकपूर्व जामीन दिल्याने दुशींग यांची अटक त्यावेळी टळली होती.

Related Articles

Back to top button