सोलापूर

बिग ब्रेकिंग! सोलापुरात आठवीच्या विद्यार्थ्याने बंदुकीने घातली स्वतःच्या डोक्यात गोळी

  • आठवीत शिकणाऱ्या एका मुलाने बंदुकीने आपल्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. सोलापूरच्या माढ्यातील आढेगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. श्रीधर गणेश नष्टे असे आत्महत्या केलेल्या या १४ वर्षांच्या मुलाचे नाव आहे.
  • याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीधर हा माढ्यातील आढेगावचा रहिवासी आहे. तो आठवीच्या वर्गात शिकत होता. त्याने बंदुकीची गोळी डोक्यात झाडून आत्महत्या केली आहे. त्याचे वडील गणेश नष्टे हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. त्यांचीच ही बंदूक आहे. या बंदुकीचे लायन्सस जम्मू काश्मीरचे आहे. त्याने आपल्या वडिलांची बंदूक घेतली. शांतपणे खुर्चीवर बसला आणि काही कळायच्या आतच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. 
  • दरम्यान, घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. श्रीधरने नेमकी आत्महत्या का केली? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Related Articles

Back to top button