- सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथील जिल्हा सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी महिलेच्या छेडछाड प्रकरणी ऐंशी वर्ष वृद्ध व तरुणास 20 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर 23 जानेवारी रोजी अटक पूर्व जामीन मंजूर केली.
- यात हकीकत अशी की, दिनांक 26 ऑक्टोबर 24 रोजी सकाळी 7 वाजून 30 वाजता आरोपी हरिष उपाध्ये व ध्रुव थोटकर यांनी पीडितेच्या घरी येऊन पीडितेला व तिच्या पतीस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व पीडितेचा गाऊन फाडले व पीडितेला लज्जा वाटेल असे कृत्य केले व तसेच पीडितेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. म्हणून आरोपी विरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम 333, 74, 119 (1)115 ( 2) 351 (3 ) 3(5) अन्वये फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवले. आरोपी मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटक पूर्व जामीनाचा अर्ज दाखल केले. यात आरोपी तर्फे असे युक्तिवाद करण्यात आले की, आरोपी व पीडितेच्या पती सोबत आर्थिक व्यवहार झालेले असून सदर व्यवहारातील रक्कम बुडवण्याकरिता आरोपी विरूद्ध खोटी फिर्याद नोंदवले.
- वास्तविक पाहता सदरच्या फिर्यादीत विलंब झालेला असून ती फिर्याद खोटी आहे. अशी कोणतीही घटना घडलेली नाही.असा युक्तिवाद ॲड मोहन कुरापाटी यांनी केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपींना 20 हजार च्या जात मुचलक्यावर अटक पूर्व जामीन मंजूर केले. याकामी ॲड अनिल वासम, ॲड चैतन्य केंगार, ॲड स्नेहा पसनुर, ॲड. शाम आडम यांनी पाहिले.
सोलापूर ब्रेकिंग! ऐंशी वर्ष वृद्ध व तरुणावर महिलेच्या छेडछाडीचा आरोप
