सोलापूर
ब्रेकिंग! महायुतीचे मंत्री ठरले, पण…

- अलीकडे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा शपथविधी पार पडला. मात्र, सरकार स्थापन होऊन दहा दिवस उलटले तरी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार झाला नाही. आज नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नागपुरातील राजभवनातील लॉनमध्ये हा शपथविधी सोहळा रंगणार आहे.
- मंत्रिपद कुणाला द्यायचे याचा निर्णय होऊन संभाव्य मंत्र्यांचे फोन खणखणू लागले आहेत. मंत्रिपदासाठी नावे निश्चित करताना काही माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील आमदार फोनची वाट पाहत आहेत. मात्र एकाही आमदाराला फोन आलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. महायुती सरकारच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराचे नाव नाही.
- आजमितीस सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. परंतु, या पाचपैकी एकाही आमदाराला मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही. मागील पाच वर्षांचा विचार केला तर महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नव्हते. आता हीच पुनरावृत्ती नव्या सरकारमध्येही होताना दिसत आहे.