महाराष्ट्र

माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे xxx च कापले पाहिजे

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आता या घटनेवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी संताप व्यक्त केला. विकृत कृत्य करणाऱ्यांचे साxxचं कापले पाहिजे, असे विधान त्यांनी केले.
यवतमाळमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमात बोलताना अजितदादा म्हणाले की, राज्यात महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवण्याची गरज आहे. त्यांना कायद्याचा धाक बसला पाहिजे. त्यांच्या मनात तशा प्रकारचा पुन्हा विचारही येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जो चुकीचे वागेल त्याला शासन झालेच पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचे झाले तर त्यांचे साXXचं काढून टाकले पाहिजे, असा संताप अजितदादांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button