मनोरंजन
औरंगजेब म्हणजे क्रुरकर्मा होता, त्याने हिंदूंची मंदिरे तोडली, आया-बहिणींवर अत्याचार केले

- छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत असतानाच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी धक्कादायक विधान केले. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, अशी स्तुतीसुमने आझमींनी उधळली.
- तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असेही ते म्हणाले. यावरूनआता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमींवर जोरदार टीका केली आहे.
- औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे अत्यंत दुर्दैवी आहे. आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, असे शिंदे म्हणाले.
- माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे ४० दिवस हाल करून मारले. त्यांचा अपमान केला, अत्याचार केला. अशा अत्याचार केलेल्या औरंगजेबला चांगले म्हणणे हे दुर्दैवी आहे. औरंगजेब म्हणजे क्रुरकर्मा होता. त्याने हिंदूंची मंदिरे तोडली. त्याने गरिबांना लुटले. आया-बहिणींवर अत्याचार केले. त्याने अनेकांना धर्मपरिवर्तन करायला लावले. असा व्यक्ती चांगला प्रशासक कसा होऊ शकतो, असा सवाल शिंदेंनी केला.