खेळ

अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार

  • टीम इंडियाच्या जर्सीचा नवा स्पॉन्सर कोण असणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. ड्रीम इलेव्हननंतर सर्वांचे लक्ष या नव्या कराराकडे लागले होते. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवा जर्सी स्पॉन्सर होणार आहे. या कराराची किंमत तब्बल 579 कोटी रुपये आहे. मात्र, अद्याप बीसीसीआयकडून या कराराबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही क्रिकेटप्रेमींमध्ये या डीलमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
  • टीम इंडियाला अखेर नवा जर्सी स्पॉन्सर मिळाला आहे. ड्रीम इलेव्हननंतर कोणता ब्रँड टीम इंडियाच्या जर्सीवर झळकणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. अखेर गुरुग्रामस्थित अपोलो टायर्स या कंपनीने मोठी बोली लावत हा करार जिंकला आहे. या कराराची किंमत तब्बल 579 कोटी रुपये इतकी असल्याचे समजते.
  • क्रिकबझच्या वृत्तानुसार, अपोलो टायर्सचा कार्यकाळ 2027 पर्यंत राहणार असून या काळात टीम इंडिया 121 बायलेटरल सामने आणि 21 आयसीसी सामने खेळणार आहे. या करारानुसार, बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी 4.5 कोटी रुपये मिळणार आहेत. याआधी ड्रीम इलेव्हनकडून प्रति सामना चार कोटी रुपये मिळत होते. त्यामुळे हा करार बीसीसीआयसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.

Related Articles

Back to top button