क्राईम
गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना

राज्यभरात गणपती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. लाडक्या गणरायाला मंगळवारी निरोप देण्यात आला. मात्र, नागपूर जिल्ह्यातील उमरखेड येथे काल काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली आहे. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सुरू असतांना काही जण फटाके फोडत होते. यातील एक आकाश बॉम्ब हा खालीच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात ११ महिला भाजल्या. त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. यातील काहींच्या चेहऱ्याला मोठ्या जखमा झाल्या आहेत.
नागपूरमध्ये काल रात्री गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. विसर्जन मिरवणुकीत फोडण्यात येणारे आकाशात बॉम्ब हे गर्दीत उभे असलेल्या लोकांच्या अंगावर जाऊन फुटले. यात ११ महिला भाजल्याने जखमी झाल्या आहेत. ही घटना काल रात्री ९ च्या सुमारास इतवारी रोडवरील श्रीकृष्ण मंदिराजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार शिवस्नेह मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक काल काढण्यात आली. यावेळी येथे एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर आकाश बॉम्ब हे आकाशात न जाता खालीच फुटले. यातील काही फटाके हे खाली असलेल्या गर्दीवर पडले व फुटले. यावेळी मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नागरिकांच्या अंगावर काही फटाके फुटल्याने यात ११ महिला भाजल्या.