क्राईम

ब्रेकिंग! कुछ तो गडबड है दया…अक्षय शिंदे एन्काऊंटर की कट?

बदलापुरच्या शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत एन्काऊंटर करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुरुवातीला अक्षय शिंदेने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेत तीन गोळ्या झाडल्याने बचावासाठी पोलिसांनी अक्षयवर गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये अक्षयचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. 
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याने आता सीआयडी गुन्हे अन्वेषण शाखेकडून या प्रकरणाचे सत्य शोधून काढण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button