संतोष देशमुखांची हत्या, मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणे, यामध्ये कोणतेही जातीय, पक्षीय राजकारण नाही. देशमुख माझ्या भाजपचा बूथ एजंट होता. भाजपचा इतका प्रामाणिक बूथप्रमुख, जर इतक्या बेकार पद्धतीने मारला असेल तर भाजपच्या त्या बूथप्रमुखासोबत राहणे मी पसंत करेन, असे आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले. राजकारणात यासाठी मला कोणतीही किंमत मोजायची वेळ आली तरी चालेल, पण मी देशमुख यांच्या मारेकऱ्याला सोडणार नाही. या प्रश्नावर आक्रमकपणे बोलत असताना माझे साहेब (देवेंद्र फडणवीस) काहीही बोललेले नाही.
या प्रकरणात देवेंद्रजी बोलाही म्हटले नाहीत, अन् नका बोलू असे देखील म्हटले नाहीत. मी मात्र रोज बोलतोय. कारण माझा बूथ प्रमुख हरवलेला आहे. भाजपच्या बूथप्रमुखाची अत्यंत बेकारपणे हत्या झालीय, त्यावर बोलू नका म्हटल्यावर अर्थच उरत नाही. राष्ट्रवादीचे नेते महायुती तुटू शकते, असे म्हणतात यावर धस म्हणाले की, अमोल मिटकरी, सुरज चव्हाण हे काय राष्ट्रवादीचे नेते आहेत का? यावर मुन्नीने बोलावे. बारक्यांनी माझ्या विरोधात बोलू नये. हे मला तोंडी लावायला पण पुरत नाही, असे धस म्हणाले.



