क्राईम
‘आकां’चे आका मुंडे, अन् ‘सरताज’ देवेंद्र फडणवीस

- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस हे गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप अंधारेंनी केला. तसेच हा जीवघेणा खेळ थांबवा, असे आवाहन अंधारेंनी केले.
- धनंजय देशमुख हे आत्महत्सेसाठी प्रवृत्त होतात, याला कारण समस्त आकाचे सरताज फडणवीस हे गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप अंधारेंनी केला. अंधारे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. या पोस्टमधून त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
- अंधारेंनी लिहिले की, उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात. याला कारण समस्त आकांचे सरताज फडणवीस जी हे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. सध्या मस्साजोगमध्ये जे चालले आहे, ते पाहता संतोष देशमुखांची हत्या भाजप इष्टापत्ती म्हणून बघत आहे का? फडणवीस साहेब हा जीवघेणा खेळ थांबवा.