क्राईम
संतोष देशमुखांच्या पत्नीच्या जबाबाने खळबळ

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात एक मोठी माहिती समोर आली असून देशमुख यांच्या पत्नी अश्विनी यांनी सीआयडीला दिलेल्या पुरवणी जबाबात धक्कादायक खुलासा केला आहे. यात देशमुख यांच्या पत्नीने संतोष यांना नोव्हेंबर महिन्यामध्येच वाल्मिक कराडने जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे म्हटल्याचे सूत्रांच्या माहितीतून समोर येत आहे. यामुळे देशमुख अस्वस्थ होते. वाल्मिक आणि विष्णू चाटेकडून ही धमकी मिळाल्याची माहिती अश्विनी यांनी दिली आहे.
- देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपींविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतिक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे, सिद्धार्थ सोनावणे या सात जणांविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे. मात्र, यात या सर्व कारवाईत वाल्मिकचे नाव घेण्यात आलेले नाही. देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. पण वाल्मिकला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिकला मोक्का